लहानपणापासूनच तो असाच आहे. किंबहुना माझी आणि त्याची ओळख जेव्हा झाली तेव्हापासून तरी तो मला तसाच भासतो. वर्षभर त्याच्यासोबत राहिल्याने माझ्यामधील 'त्या' छोट्याश्या बीजाचं बरचं मोठ रोपट झालं. त्यामधे त्याची काहीच चूक नव्हती. बीजाला पोषक वातावरण मिळाल की त्याची वाढ होणारच ही निसर्गतः चालत आलेली गोष्ट आहे. मग ते बीज जमिनीत पेरलेलं असेल किंवा आपल्यामधेच अंगभूत असेल. पोषक वातावरणात ते वाढणारच. आणि 'तो' त्या वातावरणाचाच एक भाग होता..
काहीच संदर्भ लागत नसेल. हो ना..? कोण तो, कुठलं रोपट आणि कसलं बीज..?
'तो'- माझा जवळचा मित्र. त्याच्यासारखे अनेक जण पाहिले मी. समवयस्कही आणि मोठेही. समवयस्कांबाबतीच कोडं लवकर सुटायच. मोठ्यांच्या बाबतीतील कोडयाला अर्थपूर्ण दृष्टीची चावी अशातच मिळाली. म्हणून ते जरा उशीरा सुटायला लागलं. मीही ह्या सगळ्यांसारखाच होतो. हो...होतो. पण मला बदलण भाग आहे हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी प्रयत्नपूर्वक बदलण्यासाठी सुरवात केली. हळूहळूच ती. कासवाच्या गतीने.. कासवासारखीच...
नक्कीच संदर्भ अजूनही लागत नसणार..आणि ज्यांना लागलाय त्यांना या संदर्भाच स्पष्टीकरण अजुनच Interesting असणार.. नाही का..? असो.
प्रत्येकाचा एक विशिष्ट स्वभाव असतो. त्या स्वभावाच्या अनेक पैलुंमधील एक पैलू म्हणजे ते बीज.. त्याचच हे रोपट आणि काही जणांमधे झालेला त्याचाच वटवृक्ष.. अशातच अनेकांच्या अस्पष्ट स्वभावामधे मला हा पैलू स्पष्टपणे दिसून आला. कदाचित तो माझ्यामधेही होता किंबहुना अंशतः अजूनही आहेच म्हणून इतका स्पष्टपणे दिसला असावा.
'व्यक्ती' हा शब्द फक्त माणसांनाच का लागु होत असावा हा प्रश्न मला पडला होता. आणि उत्तरासाठी एका क्षणाचीही उसंत न घेता "ज्याला व्यक्त होता येत ती व्यक्ती." इतकं साधं, सरळ उत्तर त्या मनाने मला दिलं. मग बाकीचे प्राणी किंवा सजीव व्यक्त होत नाहीत का..?ह्या खोलात मीही गेलो नाही. कदाचित माझ्या विचारांच्या पार्श्वभुमीला अनुसरून असणारी ह्या व्यक्तीची व्याख़्या त्या मनाने तात्काळ माझ्यासमोर पेश केली. व्यक्त होता येणारी ती व्यक्ती..
माझ्यासहीत अनेकांच्या स्वभावात दिसलेला तो पैलू म्हणजे 'व्यक्त होता न येणं.' इथे हा 'न' महत्वाचा.. जेव्हा एकाच विचाराचा भुंगा आपल्याभोवती सारखा भ्रमण करत असतो आणि आपण त्याला धड पकडुही शकत नाही ना लांबही करू शकत नाही तेव्हा कोणाचीतरी मदत घेऊन त्या भुंग्याला आपल्यापासून दूर सारणं आपल्यासाठी कधीही मानसिकदृष्ट्या चांगल ठरतं. कारण शारीरिक ताणापेक्षा मानसिक ताणच माणसाला जास्त थकवतो. अशावेळी जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नसतो तेव्हा त्याच गोष्टीचा विचार आपण जास्त वेळ करतो.. मग ती परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, भविष्य, वर्तमान, भूतकाळ असेल. ते काहीही असू शकत. त्याला सीमाच नाही. किती वेळ विचार करायचा ह्याची सीमा ज्याची त्याने ठरवायची असते. पण केवळ त्याच गोष्टीवर विचार केल्याने आणि मनात चाललेल्या प्रश्न-उत्तरांच्या खेळांना वाट न मिळाल्याने त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो. हे तुमच्या-आमच्यापैकी प्रत्येकानेच कधी न कधी अनुभवलं असेलच. कारण त्या मनातील प्रश्नांचं समाधान आपण दिलेल्या उत्तराने काही काळच होत. त्यानंतर मात्र त्यांना योग्य उत्तराची आस असते आणि म्हणूनच ते डोकावतात. पुन्हा पुन्हा..
विनयसोबत अस अनेकदा होत असे. त्याला एखादी मनातील गोष्ट जेव्हा समोरच्याला सांगावीशी वाटत असे तेव्हा तो सांगू शकत नसे. एकदा त्याच्याच अत्यंत जवळच्या आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला सांगायची असलेली गोष्ट तो बरेच दिवस, महिने, वर्ष सांगू शकत नव्हता. परंतु तीच गोष्ट त्याला रोज खात असे. त्यांना सांगितल्यानंतरच्या परिणामांच्या भितीने किंवा त्यांच्याप्रती असलेल्या आदरयुक्त भीतीपोटी तो या गोष्टीबाबत त्यांच्यासमोर खंबीरपणे उभा राहू शकला नसेल. परंतु एक दिवस मात्र त्याने पत्र लिहून त्यांना सगळ सांगून टाकलं आणि त्या क्षणापासून ते विचार अन् त्यांचा तो भुंगा त्याच्यापासून कायमचा दूर गेला. इतके दिवस ओझं वाटणारी गोष्ट जेव्हा त्याने पत्ररूपी का होईना व्यक्त केली तेव्हा त्याचच मन हलकं झालं अस तो म्हणाला आणि नंतर तिच गोष्ट सांगायला आपण उगीच इतका वेळ लावला, उगीच ते ओझं तसच घेऊन राहिलो अस त्याला वाटायला लागलं. इथे त्याला त्या पत्राची मदत झाली. कारण त्याला त्या रोजच्या गरगरणाऱ्या भुंग्यापासून मुक्तता हवी होती आणि त्यासाठीच व्यक्तता नितांत आवश्यक होती. ते पत्ररूपी माध्यम फक्त एक रस्ता होता. अनेकांमधला एक. त्या रस्त्यावरून चालत जाऊन समोरच्याजवळ व्यक्त होणं त्याच्यासाठी महाकठीण काम होत. म्हणूनच व्यक्त झाल्यानंतरचा आनंद त्याच्या मनाला हलकं करून गेला. चालत आलेला तो अवघड रस्ता आता मात्र त्याला सोपा वाटू लागला. म्हणूनच त्या रस्त्यावर चालणं महत्वाचं, समोरच्याजवळ व्यक्त होणं महत्वाचं.. कारण माध्यमांपेक्षा त्याच्यानंतरच्या परिणामाची गरज आपल्याला जास्त असते. हो ना..?
असो..
मधुराचही असचं काहीसं होत. तिच्याबद्दल मला अनेक मित्र-मैत्रीण म्हणाले होते की ती फारच secretive आहे and all. मलाही पहिल्यांदा भारी वाटायचं. आपल्या मनातील गोष्टी ती कोणालाच कळू देत नाही ही खासियतच झाली तिची.. नाही का..? आणि एक दिवस अचानक वाटलं, "अरे, स्वतःच्या मनातील गोष्टी व्यक्त होण्यासारखा एकही माणूस हिच्या आयुष्यात नाही..? " जेव्हा हीच गोष्ट मी तिला बोलून दाखवली तेव्हा तिच्या Secretive पणाची तिलाच कीव आली आणि तिनेही स्वतःमधल्या एका नवीन बदलाला सुरुवात केली. आज ती आधीपेक्षाही आनंदी आहे अन् छोट्या छोट्या व्यक्ततेतून मुक्त होत आहे.
असे अनेक प्रसंग, घटना, व्यक्ती आपण सगळेच रोज अनुभवतो. आपल्याजवळही अनेक जण त्यांच्या व्यक्तीगत जीवनातील गोष्टी व्यक्त करून मोकळे होतात. आपणही त्यांना योग्य सल्ला देऊन योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या व्यक्तीजवळ अशा अनेक व्यक्ती व्यक्त होत असतात त्यालाच जेव्हा मनातील भावनांच्या खेळापासून व्यक्त होऊन मुक्त व्हायचं असत तेव्हा तो तेवढ्याच सहजासहजी होऊ शकत नाही हे ही तितकचं खरं. म्हणूनच त्याने त्या रस्त्यावर आपणहून चालायचं असतं, ते माध्यम आपणहून शोधायचं असत, ती आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यांची कमी कधीच नसते. जसं गाणं गाणाऱ्यासाठी सूर पक्क असणं आवश्यक असत अन् ते नसल्यास कच्च्या सुरांना रियाझाने पक्क करता येत तसचं माणसाला आनंदी राहण्यासाठी मन शांत असणं आवश्यक असतं अन् ते नसल्यास हडबडलेल्या मनाला व्यक्ततेच्या आधाराने मुक्त, शांत करता येत..
या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर, " व्यक्ती म्हणून जगताना वेळोवेळी व्यक्त होणं भागचं असतं, तिथे माध्यमांचा वा परिस्थितीचा विचार करायचा नसतो ह्याची आज शाश्वती झाली." कदाचित हे लिहिलेलं अनेकांनी अनुभवलं असेल, अनेकांना ते नवीनही असेल. माझ्यासारख्याच अनेकांनी मनातील भावनांच्या खेळांना व्यक्त करण्याचे स्वतःचे मार्गही शोधून काढले असतील. कागद-पेनाच्या सहाय्याने व्यक्त होण्याच्या ह्या मार्गात सुसूत्रता, साचेबद्धपणा आहे की नाही हे मीही जाणत नाही. पण मला मार्ग सापडला..
व्यक्त होण्याचा..
तुमच काय..??
- मकरंद
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा