मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

वसंत पुरुषोत्तम काळे-एक अवलिया..




वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ वपु...
साहित्य क्षेत्रातील एक गाजलेल आणि तेवढचं नावाजलेलं नाव..स्वतःच्या कथांमधुन जगाला पोट धरून हसवणारं.. स्वतःची दु:खे विसरायला लावणारं अन् सरतेशेवटी या जगातलं बोचरं सत्य स्पष्टपणे दाखवुन पटवुन देणारं व्यक्तिमत्व...
त्यांच्यापासूनच सुरु झालेली माझी लेखणी, कधी कधी तिच्यामधेच त्यांच्या प्रतिबिंबाचा भास करून देणारी ती
लेखणी मला आज त्यांच्यावरच चालवयाची होती..जाणुनबुजूनच...
        वाचनाची नुसती आवड असणाऱ्या आणि ती सामान्यपणे कृतीत न उतरवणाऱ्या अनेकांसारख्या मला
वाचनाचं वेड लावणारा लेखक म्हणजे वपु..
रोजच्या जीवनात येणारे अनुभव, भेटणारे असंख्य स्वभावाचे अगणित माणसं, त्या अगणित माणसांचे अमर्याद स्वभाव अन् मनात असलेला अपार शब्दांचा साठा हे त्यांच भांडार होत आणि त्यातूनच साकारला त्यांनी लेखकांच्या यादीत गणला गेलेला अन् सतत बहरत जाणारा वसंत...
         जीवनातल्या कुठल्याही अनुभवाला हसत हसत सामोरं जाणं, दु:खातही सुखाचा शोध घेणं, वाईटातही चांगलच बघणं हे त्यांनी त्यांच्या शब्दसामर्थ्याने लोकांच्या
मनावर आदर्शपणे बिंबवल होत.
         " माणसं कृती विसरतात पण शब्द मनाला लावून घेतात " हया कोणीतरी म्हणलेल्या वाकयातुन त्यांनी मात्र समर्पक अर्थ घेत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या या जगाचे विविध रूपे लोकांसमोर ठेवली.
त्यांना हवं तेव्हा हवं ते उचलण्यासाठीच..
        वपुर्झा, दोस्त, प्लेझर बॉक्स ही त्यांची २-३ पुस्तके मला त्यांच्याशी खिळवुन ठेवण्यासाठी पुरेशी ठरली.
त्यांच्याच काळात पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, चिं.वि.जोशी, द.मा.मिराजदार असे अनेक प्रतिभावंत लेखक होउन गेले. पण वपु हे वपुच होते. पुरुषोत्तमाचा वारसा लाभलेल्या अन् वसंतासारख्या बहरत जाणाऱ्या या लेखकाची लेखन शैली काही औरच होती. त्यात त्यांच्या भाव-भावना त्यांच्याही नकळत गुंफल्या गेल्या होत्या. त्यांच्या वैयक्तिक अनुभवांना त्यांनी सार्वजनिक रूप दिले होते. म्हणुनच ते अनेकांना भावले होते अन् माझ्यासारखे तर असंख्य जण त्यांच्या प्रेमातच पडले होते. ते प्रेम वेगळचं असतं..फुलाचं फुलपाखरावर असत तस..फुलाला कळत असत की आपल्यातला मकरंद ते फुलपाखरु घेतय..पण तरीही ते निःशब्दच असतं.. कारण त्या फुलपाखराच्या समधानातच फुलाचं समाधान सामावलेलं असतं.. वपु ते फुल होते.. आपण ते फुलपाखरु आणि तो मकरंद म्हणजे
त्यांच साहित्य...
         त्या साध्या अनुभवांना स्वतःच्या अजोड कल्पनाशक्तीने अजरामर करणारे वपु खरचं grt होते. आजच्या काळात त्यांच्यासारख्यांची उणीव जाणविल्याशिवाय रहावेल काय..??
"ते हयात होते तेव्हा आपण वयात नव्हतो आणि आज आपण वयात आलोय तर ते हयात नाहीयेत.." हे आपलं दुर्दैवच म्हणायचं ना..?
पण जाता जाता त्यांनी आपल्यासाठी साहित्यरूपी मकरंद तयार करून ठेवलाय.. तो चाखणं हे आपलं काम.आजही त्यांची पुस्तके वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही..मनातुन 'व्वा..!!' अशी दाद निघल्याशिवाय राहत नाही..अन् सरतेशेवटी त्यांच्या अशक्य अश्या एका, केवळ एका भेटीसाठी तळमळणाऱ्या जीवातुन ओघळणाऱ्या
अश्रुंच्या धारा थोपवणं आपल्यालाही जमत नाही..
अशा वेळी मनात इतक्या भावना असतात की त्यांना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी शब्दच सापडत नाहीत आणि कधी कधी हे सगळ असुनही आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहचवु शकत नाही..हे ज्या त्या वेळी ज्याच त्यालाच कळत असतं..अन् मी तर त्या अनुभवातुन अनेकदा जात होतो..
     खरच वपु तुम्ही grt आहात. देहरुपी नसलात तरी तुम्ही माझ्यासहित अनेकांच्या मनात घर करून बसलायत..ती नियतीसुद्धा तिचं तुमच्यावरचं प्रेम रोखुन धरु शकली नाही. म्हणूनच स्वतःबरोबर तुमच्यासारखा काळाला जगवणारा एक अवलिया स्वतःच्या पदरात टाकुन घेउन गेली.
         सरतेशेवटी एकच इच्छा..
माझा " जिगरी दोस्त " झालेल्या या अवलियाला तुम्ही एकदातरी भेट देणार...??
त्याच्या मकरंदरुपाने...??
             
                       - मकरंद

                                                                                                   ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: