एक रम्य संध्याकाळ...
अशीच एक रम्य संध्याकाळ..
संध्याकाळेला कोणीतरी, कधीतरी दिलेलं हे "रम्य'' विशेषण Perfect Match झालय. संध्याकाळ असावी तर रम्यचं..ती रोजच असते. फक्त चेहरे बदलतात. तिला अनुभवणारे. कधी ती आपली असते तर कधी दुसऱ्यांची. पण संध्याकाळ ही असतेच...रम्य अशी..
सुर्य मावळत होता आणि वातावरणातील बदलाला सुरुवात होत होती. दिवसभर नकोसा वाटणारा सुर्य मावळताना मात्र हवाहवासा वाटू लागला होता. दिवसभर सगळ्यांना स्वतःच्या वर्चस्वाने त्रस्त करणारा हाच सुर्य जाताना मात्र सगळ्यांना सुखावून जातो. माझ्यासहित..सासरी जाणाऱ्या नववधुला बिदाईच्या वेळेस बघण्याची जशी अनेकांना इच्छा असते तशीच ह्यालाही मावळताना बघण्याची आजकाल अनेकांनाच इच्छा होतेय. नववधूच्या बाबतीत ती पूर्ण करणारे हमखास असतात. तशीच ह्याच्या बाबतीत ती पूर्ण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. Modern भाषेतील त्याचा हा SUNSET आता हळुहळु SET होण्याच्या मार्गावरच आहे..असो..
आज त्या संध्याकाळीच रम्य विशेषण मला लागू पडत होत. आजची ती संध्याकाळ मला आवडली होती. ते वातावरण हवहवसं वाटत होत. त्यात एक भाव होता म्हणून ते मनाला भावलही होत. गच्चीवरून दिसणाऱ्या मावळत्या सुर्याला सलाम ठोकुन मी गॅलरीत आलो. मनाचं आणि नजरेचं मधल्या मधेच काहीतरी Interaction होत असणारे. कारण मनात चाललेले विचार ती नजर अलगद पकडत होती. अन् एक अनपेक्षित आनंद देऊन जात होती. क्षणभर सुखावणारा..त्या मनालाच..
चहाची तल्लफ असलेला माणूस जेव्हा फक्कड असा चहा पितो तेव्हा त्या जीभेला मिळालेला चवीचा आनंद आणि मला होत असलेला हा आनंद कदाचित सारखाच असू शकेल.
क्षणिकच तो..पण मनात साठणारा असा..
मनाचं आणि नजरेच जमलेलं हे Combination केवळ लाजवाबच. शब्दांपलीकडचं. असे प्रत्यय अनेकांना येत असतील. पण आज वेळ माझी होती. विचारांच्या त्या गतीला नजर स्वतःचा ब्रेक लावत नव्हती..
गॅलरीत उभा होतो. काहीतरी बघायचं होत. त्या रम्य विशेषणाला साजेसं असं. झाडांची सळसळणारी पाने, त्यामुळे येणारा थंड वारा, चिमण्यांची चिवचिव, कोकिळेचं मधुर कुजन, एकंदरीत पक्ष्यांचा किलबिलाट, तो गारवा हे सगळं परिचित होत. हे रोजचं होत होतं. न चुकता. बाह्यअंगापर्यंत मर्यादित असणाऱ्या ह्या गोष्टी आज अंतरंगात घर करू पाहत होत्या. मग मीही त्यांना अडवलं नाही.
धकाधकीच्या या आपल्या जीवनात कृत्रिम सुखाच्या मागे धावताना निसर्गाकडून मिळणाऱ्या रोजच्या आनंदाला मुकणाऱ्या तुमच्यातीलच मला आणि कदाचित तुम्हालाही तो बघण्यासाठी, मिळविण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी एका जाणीवपूर्वक नजरेने त्याच्याकडे पहाव लागत होत. आणि मला मिळणारं ते सुखं कदाचित इथे व्यक्त करण्यापलीकडचं होत. कधीकाळी चालता-बोलता हे सगळ अनुभवणाऱ्या आपल्याला आज ते अनुभवण्यासाठी एका जाणीवेची गरज भासत होती आणि ती जाणीव होण्यासाठी एका एकांताची...असो.
आज माझीच नजर रोजच्याच गोष्टी वेगळ्याच तऱ्हेने पाहत होती. अनुभवत होती. मनात साठवत होती. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. मी चप्पल पायात सरकवल्या. कानात Headphones घातले आणि पावलं चालू लागली. किशोर, मुकेश आणि रफी साहेबांच्या गाण्यांच्या तालावर..एकटीच..
कुठलं गाण कधी लावायचं हे त्या Mobile मधल्या Shuffle Mode ला ही कळून चुकल होत. मिनीटा-मिनीटांनी बदलणाऱ्या गाण्यांनी विचारही बदलत होते. त्यांच्या गतीशी जुळवुन घेणारी नजरही बदलत होती आणि नजरेनिशी तिला हवसं अस वातावरणही तयार होत होतं. गाण्यांचा ठेका पडत होता, पावलांनी ताल धरला होता आणि डोळ्यातील ती नजर तिला जो पाहिजे तो सूर आवळत होती.
रोज दिसणाऱ्या अनेक लोकांकडे पाहून आज वेगळीच जाणीव झाली. जोडीने गप्पा मारत जाणारे अनेक काका-काकु रोजच दिसायचे. पण त्यांच्यातील हसणाऱ्या काकु आणि हसवणाऱ्या काकांना बघून माझ्याही चेहऱ्यावर नकळत हसु आलं. मुलांच्या हट्टाने बागेत आलेली जोडपी ही सहसा दिसणारीच.
"पण किमान त्यांच्या हट्टाने का होईना आपल्या दोघात निवांत गप्पा झाल्याचा" त्यांना झालेला आनंद आणि ते समाधान आज त्या नजरेने हेरल..
ऑफीसमधल्या कामाचा शीण आलेले काका घरी जाणाऱ्या बसची आतुरतेने वाट पाहत उभे होते. त्यांच्यासारखेच त्यांचे अनेक अनोळखी सोबतीही होते. त्यांना ह्या 'रम्य' वातावरणाशी काहीही देणं-घेणं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होत. कॉलेज, क्लासेस मधुन घरी जाणारे तरुण-तरुणी, थकलेल्या महिला असे अनेक जण नजरेत येत होते. मीही त्यांच्यातीलच एक होतो. पण आज त्यांना तटस्थ होऊन पाहत होतो. कारण आज दिवस माझा होता. हे सगळं अनुभवण्याचा..उद्या त्यांच्यातीलच कोणीतरी माझ्याजागी असणार होत आणि मी त्यांच्याजागी जाणार होतो. निसर्गाचा समसमभाव चालु ठेवण्यासाठी हे आवश्यकच होतं. आणि ते Follow करणं मलाही भागच होत. कितीही नाही म्हणलं तरीही..
मी पुढे निघालो...
रस्त्यावरच आपला संसार थाटलेल्या माय-बापाचं लहानसं लेकरु रस्त्यावरच्याच धुळीत खेळत होत. दारू पिलेल्या त्या चिमुकल्या लेकराच्या बापाला नशेमधे आपण काय करतोय हे ही कळत नव्हतं. पण तरीही तो बाप त्या लेकराला कुशीत घेण्यासाठी धडपडत होता. तो तसाच त्याच्याजवळ गेला आणि शेवटी त्याला कुशीत घेऊन तिथेच त्याच्याशी खेळु लागला. ते प्रेम वेगळंच होत. त्या बापाला दारूची नशा चढली होती आणि त्या पोराला बापाच्या प्रेमाची..
अंधार पडत होता. रस्त्यावरच्या दिव्यांनी कधीच आपापलं काम सुरु केल होत. रम्य रम्य पहायचं म्हणत मी घरापासून बराच दूर आलो होतो. पण आता तेवढच परत जायचं जीवावर आल होत. मी परत फिरलो. स्वतःला ओढत-ताणत घराजवळ आणल्यावर एक शेवटच दृश्य दिसलं..
त्या रम्य संध्याकाळीचं..
एका बाकावर एक आजी-आजोबा बसलेले होते. मला घरी जाण्यासाठी वळायच होत. पण तेवढ्यात ते उठले आणि माझे पाय जागच्या जागेवरच थांबले. का ते मलाही कळालं नाही. पण ते दोघे आता काय करतात हे मला बघायचं होत. एका हातात काठीचा पक्का आधार असतानाही आजोबांनी आजीचा हात घट्ट धरला होता. आयुष्यभर एकमेकांच्या साथीने चालल्यावरही, आजच्या तरुण-तरुणींना लाजवेल असे एकमेकांच्या हातात हात गुंफून एकेक पाऊल सावकाश टाकत ती दोघे माझ्याच दिशेने येत होती.
एकमेकांना सावरत..आधार देतं..
जसं जसं आयुष्य सरत होत तसं तसं त्यांच प्रेम अजुनच बहरत होतं. निखळ होत होतं. लोकांच्या आयुष्याच्या गाठी त्यांच्याही नकळत सुटतात. पण ही दोघे त्या गाठींना जाणतेपणे वा अजाणतेपणे जपत होती, टिकवत होती, घट्ट करीत होती. हे सगळ बघुन एका कुतूहलापोटी माझ्याही चेहऱ्यावर हास्य आलं. आणि त्या दोघांनीही त्याला हसुनच उत्तर दिलं. एका जाणीवपूर्वक टाकलेल्या नजरेच्या कटाक्षाने.. जसं काही माझ्या मनातल्या या सगळ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात असं..
ते दोघे मला ओलांडून पुढे गेले. हसतं-हसतं..आणि माझं लक्ष अचानक गाण्याकडे गेलं..
ते होत.....
" हम है राही प्यार के..
हमसे कुछ ना बोलीये..
जो भी प्यार से मिला..
हम उसी के हो लिये.........!! "
- मकरंद
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा